Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

तिब्बल शिट मोटरसायकल स्वाराने मारला ट्रकला धडक, धडकेने ३जण जखमी

 

अहेरी:- सुरजागड वरून खनिज भरून येणाऱ्या टिप्परला अहेरी वरून जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारला रात्री 7.30 वाजताच्या सुमारास आलापल्लीजवळ घडली.

बापूराव नवलू पदा (35), मनोहर लालसु पदा, (31), राहुल दिलीप मेश्राम (14) रा. चंदनवेली अशी जखमींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, बापुराव, मनोहर व राहूल हे तिघेजण अहेरी येथील कार्यक्रम आटोपून स्वगावी चंदनवेली येथे रात्री 7.30 वाजताच्या सुमारास दुचाकीने जात होते. दरम्यान एटापल्ली वरून लोहखनिज भरुन येणा-या टिप्परने आलापल्ली पासून चार-पाच किलोमीटर अंतरावरील त्यांच्या दुचाकीला जागा न दिल्याने टिप्परच्या मागच्या भागाला दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीवरील तिघेही नाल्यात जाऊन कोसळून गंभीर जखमी झाले. जखमींना एटापल्ली वरून येणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला फोन करून अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

Post a Comment

0 Comments