Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पंधरा दिवसात मूल बसस्थानकावर बसने घेतला दोघांचा जीव, मूल बस स्थानकाला ग्रहण लागल्याची शहरात चर्चा

पंधरा दिवसात मूल बसस्थानकावर बसने घेतला दोघांचा जीव, बस स्थानकाला ग्रहण लागल्याची शहरात चर्चा

मूल प्रतिनिधी

मूल बसस्थानकावर बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजताचे दरम्यान घडली. सरिता मनोज कररेवार वय 26 राहणार मारोडा असे मृत्यू पावलेल्या महिलेचा नाव आहे.

सरिता मनोज कररेवार आणि मनोज कररेवार पती पत्नी दोघेही गडचिरोली कडे जाण्यासाठी मूल बस्थानकावर बस ची वाट बघत उभे होते. एवढ्यात मूल बस्थानकावर एम एच 40 एन 8951 उभी असलेली बस चंद्रपूर कडे जाण्यासाठी निघाली. सरिता ही बस कुठे जाणार यासाठी बस समोर बोर्ड बघण्याकरिता आली मात्र बस चालकाचा दुर्लक्ष असल्याने बसने त्या महिलेला धडक दिली.

सरिता काररेवार ही खाली पडली तिला लगेच मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डोळ्यासमोर पत्नीचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना आज घडली असून मारोडा गांवात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची तक्रार मृतक सरिता
कररेवार चे पती मनोज कररेवार मूल पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पंधरा दिवसाधी मूल बस्थानकावर नादुरुस्त बस दुरुस्ती करीत असताना बस यांत्रिकाच्या अंगावर बस गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. असे असताना मूल बस स्थानकावर बसने मृत्यू पावल्याची ही दुसरी घटना असल्याने मूल बस्थानकाला ग्रहण लागल्याचे बोलल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments