Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अरुण बोडखे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उद्योग व्यापारी सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

अरुण बोडखे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उद्योग व्यापारी सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

मूल प्रतिनिधी

मूळचे मूल येथील मात्र नागपुरात रहिवासी झालेले अरुण गजाननराव बोडखे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उद्योग व्यापारी सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड गुरुपौर्णिमेच्या खास दिवशी करण्यात आली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खा. सोनिया गांधी युवा नेता राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त वेळ पक्ष संघटनेला देऊन पक्ष संघटना बळकट होण्यासाठी जोमाने कामास लागावे अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उद्योग व्यापारी सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा यांनी अरुण बोडके यांना देण्यात आले आहे.

संघटनेला वेळ देऊन संघटना मजबूत करण्याकरिता मी शक्तीनिशी वेळ देणार असल्याचे अरुण बोडखे यांनी मूल Live शी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments