Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शौचास गेलेल्या देविदास वर अस्वलीचा हल्ला

शौचास गेलेल्या देविदास वर अस्वलीचा हल्ला

मूल प्रतिनिधी
 

शौचास गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला
टेकाडी येथील देविदास चिकराम वय 40 वर्ष हा युवक शौचास गेला असता त्याच्यावर अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना टेकाडी येथे घडली.
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या टेकाडी येथील देविदास चिकराम हा सकाळी नेहमीप्रमाणे शौचास गेला होता. शौचास बसला असताना अस्वलीने त्याच्यावर हल्ला केला ही बाब बाजूच्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. मात्र देविदास गंभीर जखमी झाला. गंभीर देविदासला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

Post a Comment

0 Comments