Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शेतात आढळला 13 फूट लांबीचा अजगर

शेतात आढळला 13 फूट लांबीचा अजगर

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील चांदापुर येथील बंडू कडूकार यांच्या शेतात आज धान कापणी करतांना शेत मजुरांना आज 18 तारखेला दुपारी 2वाजता चे दरम्यान अजगर साप दिसला. अजगर असल्याची माहिती शेतात काम करणाऱ्या मजुराने शेत मालकाला दिली. शेतात मोठा अजगर साप असल्याची माहिती गावात पसरली. लगेच चांदापुर येथील दिलिप पाल यांनी ही माहिती मूल येथील संजीवन पर्यावरण संस्थेचे तन्मय झिरे यांना दिली. लगेच तन्मय झिरे आणि वेदांत निकुरे सर्पमित्र यांनी चांदापुर येथील कडूकार यांचे शेतात जाऊन अजगराला सुरक्षित पकडण्यात आले. पकडलेल्या अजगराची लांबी अदांजे 13 फुट असुन वजन अंदाजे 30 किलो असल्याचे प्राणीमित्रानी सांगितले.


Post a Comment

0 Comments