Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मंजुरी नंतरही रस्ता बांधकामाकडे मारोडा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, रस्ता त्वरित पूर्ण करा - शेतकऱ्यांची मागणी

मंजुरी नंतरही रस्ता बांधकामाकडे मारोडा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, रस्ता त्वरित पूर्ण करा - शेतकऱ्यांची मागणी

मूल प्रतिनिधी

मारोडा येथील आदर्श खेडा ते बोपाई देव पांदण रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला. एम आर जी एस च्या सीडी वर्क मधून हा रस्ता मार्च एप्रिल 2022 मध्ये मंजूर आहे. सदर बांधकामाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तात्काळ कामास प्रारंभ करावा असे प्रशासनाचे आदेश आहेत. तरीही मारोडा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे रस्ता पूर्ण केला गेला नाही. सध्या शेतामध्ये सोयाबीन धान कापणी झाली आहे.परंतु शेतात जाणारा रस्ता नसल्याने शेतकऱ्यांची मळणीची कामे थांबली आहे. मळणीकरिता कोणतीही यंत्रे शेतात जाऊ शकत नाही. दळणवळण होऊ शकत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मंजूर असलेल्या रस्ता पूर्ण होण्यास अडकाठी येत असल्याचा आरोप होत आहे.

 रस्त्या अभावी शेतातील पीक घरी येण्यास बाधा निर्माण होत आहे. हंगामाच्या काळात अवेळी पाऊस पडून पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना वारंवार सांगूनही प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता बोपाई देव पांदण रस्ता पूर्ण करून देण्यात यावा, अशी मागणी मारोडा येथील शेतकरी पंकज पुलावार यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments