Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

धानाच्या पुंजन्याला लागली आग, चांदापूर येथील घटना

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील चांदापूर येथील शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागून एक एकर शेतातील धान जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.यात अंदाजे पन्नास हजार रूपयाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

लिंगाजी नाहगमकार (67) नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लिंगाजी नाहगमकार यांचे जुनासूला येथे एक एकर शेती आहे. मेहनत करून त्यांनी धानाचे भरीव पिक घेतले होते.शेतशिवारात असलेल्या धानाच्या पुंजण्याला सोमवार पहाटेच्या सुमारास चार वाजता अचानक आग लागली.

काही वेळातच पुर्ण पुंजणा जळून खाक झाला. सदर घटनेमुळे शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा प्राथमिक अहवाल जुनासुला यांनी वरिष्ठांकडे पाठविला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments