Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गडीसुर्ला येथे महिलांचे कबड्डी सामने, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी

गडीसुर्ला येथे महिलांचे कबड्डी सामने, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे मॅजिक बस तथा शिवराया क्रीडा मंडळ गडीसूर्ला द्वारा महिलांचे एक दिवसीय कबड्डी सामने आयोजीत केले होते. या सामण्यांचा उद्देश महिलांनी चूल आणि मुल एवढच मर्यादित न राहता सगळ्या क्षेत्रात प्रगती करावी व खेळांमधे आपल्या कौशल्याचा वापर करावा.अश्या विविध उद्देशाने हे सामण्यांचा आयोजन केले होते. 

या टुर्नामेंट ला मुल तालुक्यातील चिमढा, भवराळा, फिस्कुटी,बाबराळा,नांदगाव, गडीसूर्ला गावांच्या संघांनी आपली उपस्थिती दाखविली.या संघांपैकी फिस्कुटी संघांनी पहिला तर गडीसूर्ला संघांनी दुसरा क्रमांक पटकाविला. सर्व महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा मोहूर्ले यांनी केले. प्रास्ताविक दिनेश कामतवार शाळा सहाय्यक अधिकारी यांनी केले. आभार प्रदर्शन शुभांगी रामगोनवार यांनी केले.
 
कार्यक्रमाला उपस्थित केंद्र प्रमुख कोपुलवार,गावचे सरपंच शारदा येनूरकर, सदस्य गावातील पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कावळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आंबेडकर विद्यालयाचे संपूर्ण शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, राजश्री शाहू महाराज कॉलेजचे शिक्षक युवा वर्ग तथा गावातील संपूर्ण महिला उपस्थित होत्या. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकर शाळा गडीसूर्ला येथील बालपंचायत आणि शिवराया क्रीडा मंडळ गडीसुर्ला मोलाची कामगिरी केली.शाळा सहाय्यक अधिकारी शुभांगी रामगोनवार, दिनेश कामतवार, मंजुषा कुरेकार, सोनम लाडे समुदाय समनव्यक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments