Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चंद्रपुर अ.भा.माळी महासंघाची बैठक संपन्न

चंद्रपुर अ.भा.माळी महासंघाची बैठक संपन्न 

चंद्रपूर प्रतिनिधी
 

चंद्रपुर येथील शासकीय विश्राम गृहात दि.26/2/2023 रोजी रविवारला अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानाजी आदे यांनी यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी याची सभा आयोजित केली होती, या सभेला जिल्ह्यातील  जिवती, कोरपना, राजूरा वरोरा चंद्रपुर, मूल सिंदेवाही इत्यादी सर्व तालुक्यातील  अनेक पदाधिकारीनी होते 
सभेची प्रस्तावना जिल्हाध्यक्ष नानाजी आदे यांनी मांडली विषय सभे पुढे मांडले ,अनेक पदाधिकारी यांनी समाजातील विविध समस्या वर सविस्तर चर्चा करून मत मांडली त्यात प्रामुख्याने शेतकरी, शेतमजुर, कामगार, बेरोजगार शिक्षण आणि महिला सक्षमीकरण इत्यादी विषयांवर  चर्चा करून त्याच निराकरण करण्यासाठी अ.भा.माळी महासंघाने कार्य करावे असे सभेत ठरविण्यात आले 
तत्पूर्वी, प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून, अॅड. राजेंद्र महाडोळे प्रदेश अध्यक्ष अ.भा.माळी महासंघ 
जिल्हाध्यक्ष नानाजी आदे  जिल्हा सरचिटणीस गुरूदास चौधरी, अजय महाडोळे, योगेश निकोडे,चंद्रपुर, मूल  माजी प.स.सदस्यां वर्षाताई लोनबले, यवतमाळ जिल्हा ध्यक्ष अमोल गुरूनुले, अकोला जिल्हाध्यक्ष अॅड.अकोला येथील  प्रकाशजी दाते, श्री कृष्ण बिडकर, गणेश काळपांडे, सुनिल जाधव, डाॅ. नितिन देऊळकर मंचावर उपस्थित होते ,पाहण्याच स्वागत करण्यात आले 
अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी सभेला  मार्गदर्शन केले .

सभेशेवटी काही पदाधिकारीचे नियुक्ती करून, त्याना जिल्हाध्यक्ष नानाजी आदे कडूनां पाहुण्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, मूल येथील युवा कार्यकर्ता ओमदेव मोहूरले, यांना तालुका अध्यक्ष ,तर सिंदेवाही येथील हर्षना, महाडोळे यांना महीला तालूका अध्यक्ष आणि चंद्रपुर शहर अध्यक्ष अ.भा.महासंघ पदी राजू मोहूरले यांची निवड करण्यात आली ,या सभेला,सिंदेवाही येथील ता.अध्यक्ष  विलास गुरूनुले ,हिराज सोनूले, सरदार वाढई, गजेंद्र निकूरे ,वसंता चहारे, ईश्वर लोनबले,नंदू बारस्कर  उषा शेंडे, सुनंदा लेनगुरे, राजू इंगंळे, विजय गुरूनुले इत्यादी जिल्ह्यातील  पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments