Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कविता - ते दोघे...

कविता - ते दोघे...


दोन प्रेम-पाखरे,
कुजबुज करत आहे,
दोघे एकांतातील क्षण,
वेचत आहेत...!!

गोड हितगुजाचा आवाज,
सभोवताली घुमतो आहे,
त्याचं साऱ्या क्षणांत,
जगाचे भान हरपत आहे...!!

हिरवळ निसर्गात,
दोघे खुशाल जगत आहे,
तहान-भूक सोबतीने,
भागवित आहे...!!

ऋतू पावसाळ्याची,
झळ झेलत आहे,
घरटे सांभाळत,
रात्र-दिवस काढत आहे...!!

🖋️सौ. श्रद्धा त्रिनगरीवार धर्मपुरीवार
@At.post. Chandrapur

Post a Comment

0 Comments