Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवुन युवकाचा मृत्यू #Youth dies after coming under tractor wheel

ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवुन युवकाचा मृत्यू

मूल प्रतिनिधी

अंत्यसंस्कारासाठी ट्रॅक्टरवर जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाला वाचविण्यासाठी
तालुक्यातील बेंबाळ येथील नयन अनिल मारगोनवार (२०) या युवकाचा ट्रॅक्टरखाली येवुन मृत्यू झाल्याची घटना सकाळी ११ वाजता दरम्यान घडली. ट्रॅक्टर चालकावर मूल पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बेंबाळ येथे बोमनवार नामक महिलेचा मृत्यू झाल्याने रितीरिवाजाप्रमाणे  त्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी चंदू मारगोनवार यांच्या मालकीची असलेली ट्रॅक्टर घेवुन जात  असताना बेंबाळ कोरंबी  समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचविण्यासाठी ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने ब्रेक मारला. त्यावेळी  ट्रॅक्टरवर  बसलेला नयन मारगोनवार उसळून चाकाखाली आला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. लागलीच त्याला मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले माञ त्याला तपासाणी अंती वैद्यकिय अधिकाऱ्यानी मृत घोषीत केले. मृतक हा पंचायत समिती मूलचे माजी सभापती चंदू मारगोनवार यांचा पुतण्या आहे.याबाबात  चिंतामन लाडू राऊत या ट्रॅक्टर ड्रायव्हरवर  मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments