Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शेत शिवारात आढळला 14 फुटाचा अजगर, जंगलात सोडून अजगराला जीवदान A python was found in the field

शेत शिवारात आढळला 14 फुटाचा अजगर, जंगलात सोडून अजगराला जीवदान

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यांतील चांदापुर येथील शेतशिवारात १४ फुटाचा अजगर साप आढळून आला. ही माहिती गावात होताच चांदापुर येथील लोकांनी मूल येथिल संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती देण्यात आली.

संजीवन पर्यावरण संस्थेचे जाबाज सदस्य दिनेश खेवले आणि तन्मयसिंह झिरे यांनी चांदापुर येथे जाऊन शेतशिवारातील १४ फुट लांब व २६ कीलो वजनाच्या अजगर सापाला पकडून आनले. त्यानंतर अजगराला बफर क्षेत्रातील डोनी च्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. अजगर सापाला सोडतांना वनरक्षक सूधीर ठाकुर, वनरक्षक पवन कुळमेथे, वनरक्षक खोब्रागडे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे व शक्कीर जेंगठे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments