Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे वारकरी साहित्य परिषदेची बैठक संपन्न, जिल्हास्तरीय कार्यक्रम 17 नोव्हेंबरला Varkari Sahitya Parishad

मूल येथे वारकरी साहित्य परिषदेची बैठक संपन्न, जिल्हास्तरीय कार्यक्रम 17 नोव्हेंबरला

मूल (अमित राऊत)
वारकरी साहित्य परिषद चंद्रपूर जिल्ह्याचे सभा मुल येथील मारकवार कॉम्प्लेक्स येथे पार पडली. या बैठकीत वारकरी साहित्य परिषदेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम १७ नोव्हेंबर रोजी मूल येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, मार्गदर्शक म्हणून नथुराव आरेकर उपस्थित होते. Prakash Patil Marakwar 

नवीन पिढीवर चांगले संस्कार करण्याकरिता वारकरी साहित्य परिषद काम करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वारकरी साहित्य परिषदेचे गठन करावे, असे आवाहन प्रकाश पाटील वारकवार यांनी केले. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय कार्यक्रम 17 नोव्हेंबरला मूल येथे घेण्याचे ठरले.17 November 

सभेला सुखदेव वाढई, परशुराम पाल महाराज, दादाजी संदोकार, अजिंक्य प्रकाश पाटील, नवनीत चिंचोलकर, विनायक झरकर, चरणदास पोटे, दिनकर झरकर, संतोष गुडलावार, प्रभाकर पोटे, संतोष चौधरी, संतोष शुद्धलवार, शैलेश राऊत, गणपत वाकुडकर, नानाजी रोहनकर, रवींद्र शेळके घनश्याम कडूकार, अनिल कडूकार आदी उपस्थित होते. Program

Post a Comment

0 Comments