Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथील दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

मूल येथील दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

मूल प्रतिनीधी

दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरिता पंधरा हजार रुपयाची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

मुल येथील दुय्यम निबंध कार्यालयात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. वैशाली मिटकरी असे लाचखोर महिला दुय्यम निबंधकाचे नाव आहे.
तक्रारदार मूल येथे  दस्तलेखनाचे काम करतात.
तक्रारदार यांच्या पक्षकाराची शेत जमीन फेरफार करायची होती. तक्रारदार यांनी दस्त तपासणी व शेत जमिनीचे मूल्यांकन काढून दस्ताची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता, दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांनी दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरिता गैर अर्जदार यांना शासकीय शुल्का व्यतिरिक्त पंधरा हजार रुपयाची मागणी केली होती.
परंतु तक्रारदार यांना गैर अर्जदार यास लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे भेटून तक्रार नोंदविली.

सापळा रचून पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीची गोपनीय शहानिशा करून कार्यवाही केली. यामध्ये वैशाली मिटकरी दुय्यम निबंधक यांनी शेतीचे दस्त नोंदणी करण्याचे कामाकरिता तळजोडीअंती दहा रुपये हजार रुपयाची लाज घेताना रंगेहात पकडण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.

A female secondary registrar at Mul city was arrested for accepting a bribe trap by Anti Corruption Department Chandrapur

Post a Comment

0 Comments