Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे नवरात्रोत्सवा निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह चे आयोजन

मूल येथे नवरात्रोत्सवा निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह चे आयोजन 

मूल प्रतिनिधी
नवरात्र उत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रम दिनांक 16 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर 2023 पर्यंत योग पतंजली भवन तालुका क्रीडा संकुल मॉल येथे दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत आयोजन केले आहे. वृंदावन मथुरा येथील प्रसिद्ध भागवतकार भागवताचार्य परमपूज्य आशिष जी महाराज हे श्रीमद् भागवत कथा संबोधणार आहे.
या सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दिनांक 16 ऑक्टोंबर ला सकाळी साडेदहा वाजता कलर्स यात्रा रामलीला भवन ते योग पतंजली भवन पर्यंत काढण्यात येणार आहे.
दिनांक 17 ऑक्टोबरला सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत योगा प्राणायाम व सामूहिक ज्ञान तसेच हवन यज्ञ पूजा आणि दुपारी 3 ते 6 पर्यन्त सीमा भागवत कथा राहणार आहे.
दिनांक 18 ऑक्टोंबर ला श्री भागवत कथा भगवान वराह अवतार कथा कपिल मुनी अवतार सती प्रसंग आणि भगवान शंकर पार्वती विवाह कथा होणार आहे.
19 ऑक्टोंबर ला श्रीमद् भागवत कथा ध्रुवचरित्र भरत चरित्र भगवान वामन अवतार श्रीराम अवतार संक्षिप्त रामायण श्रीकृष्ण जन्मोत्सव होणार आहे.
20 ऑक्टोंबर ला श्रीमद् भागवत कथा श्रीकृष्ण लीला रुंदावन कृष्ण गोवर्धन पूजा होली महोत्सव होणार आहे.
21 ऑक्टोबरला श्रीमद् भागवत कथा कंस उद्धार मथुरा व द्वारकालीला रुक्मिणी स्वयंवर श्रीकृष्ण विवाह यावर होणार आहे.
दिनांक 22 ऑक्टोंबर ला श्रीमद् भागवत कथा श्रीकृष्णाचे इतर विवाह प्रसंग सुदामा चरित्र राजा परीक्षित मोक्षक कथा आधी कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २३ ऑक्टोंबरला यज्ञ महाप्रसाद ब्रह्म भोजन वेळ दुपारी चार ते आठ वाजेपर्यंत अशा पद्धतीचे सात दिवस श्रीमद् भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताह होणार आहे. श्रीमद् भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताह ला शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक पतंजली योग समिती मूलतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments