Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वन्यजीव सप्ताह निमित्त मूल येथे कार्यक्रमाची सांगता

वन्यजीव सप्ताह निमित्त मूल येथे कार्यक्रमाची सांगता

मूल प्रतिनिधी

दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी वन्यजीव सप्ताहानिमित्य वनपरीक्षेत्र चिचपल्ली येथुन उपक्षेत्र मुल येथे बाईक रॅली काढुन लोकांमध्ये वन व वन्यजीवाबद्दल जनजागृती करून पंडीत दीनदयाल उपाध्याय इको पार्क मुल येथे वन्यजीव सप्ताह समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन श्री.मा. घोरुडे सर ,वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली, प्रमुख अतिथी म्हणून श्री. मा. बोथे सर वनपरिक्षेत्र अधिकारी (एफ डी सी एम) चिचपल्ली ,माजी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर ,संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सौ.तेजस्वीनी नागोसे , श्रीमती अल्काताई राजमलवार ,श्री श्रीरंग नागोसे ,कुमारी कुमुदिनी भोयर तसेच वनपरीक्षेत्र चिचपल्ली येथील सर्व क्षेत्रीय कर्मचारी संजीवन पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्य नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी वन्य प्राणी यांचे पर्यावरणातील महत्त्व या विषयावर उपयुक्त माहिती दिली. मान्यवर आणि सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या सप्पंन झाले.

Post a Comment

0 Comments