Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शूरवी महीला महाविद्यालय, मूल येथे गांधी जयंती निमित्य स्वच्छता अभियान Cleanliness campaign on the occasion of Gandhi Jayanti

शूरवी महीला महाविद्यालय, मूल येथे गांधी जयंती निमित्य स्वच्छता अभियान

मूल (अमित राऊत)


श्री माता कन्यका सेवा संस्थेद्वारे संचालित शूरवी महिला महाविद्यालय मूल येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयच्या प्रभारी प्राचार्या सौ. हर्षा खरासे मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी प्रा.विक्की बोंदगुलवार सर व प्रा.आशीष आष्टणकर सर उपस्थित होते. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांनी विध्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सोबतच कु.गौरी शेरकी या विद्यार्थिनीने आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे अधयक्ष मान. सुदेश कापर्तिवार सर तसेच संस्थेचे सचिव मान. राजेश्वर सुरावार सर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैष्णवी चिंतावार मॅडम यांनी केले तर आभार प्रा. सौरभ तरारे सर यांनी मानले.

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन स्वच्छतेची शपथ घेऊन महाविध्यालय परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थीनिंनी सहभग नोंदविला.

Post a Comment

0 Comments