Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ग्राहक पंचायतची मूल तालुका कार्यकारिणी गठित अध्यक्षपदी दीपक देशपांडेConsumer Panchayat Executive

ग्राहक पंचायतची मूल तालुका कार्यकारिणी गठित अध्यक्षपदी दीपक देशपांडे

मूल प्रतिनिधी

विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांच्या उपस्थितीत विदर्भ प्रांत संघटक डॉ.कल्पना उपाध्याय यांनी दीपक देशपांडे यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तालुका मूल चे अध्यक्ष घोषित केले.


ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका मूल, जिल्हा चंद्रपूरची कार्यकारिणी
अध्यक्ष = दीपक देशपांडे
उपाध्यक्ष =अशोक मैदमवार
सचिव = बादल करपे
संघटक = तुळशीराम बांगरे
सहसंघटक = राहुल आगडे

कार्यकारिणी सदस्य -परशुराम शेंडे. कार्यकारिणी सदस्य -लक्ष्मण निकुरे. कार्यकारिणी सदस्य – गणेश आक्केवार. कार्यकारिणी सदस्य -सुनिल सेलेकर. तर उर्वरित पदाधिकारी यांची निवड करण्याचे व संघटनेच्या वाढीसाठी काही फेरबदल करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले आहेत .


याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडुलवार, कार्याध्यक्ष अरूण जामदाडे, जिल्हा सचिव आनंद मेहरकूरे‌, देविदास नंदनवार, सुधाकर बद्दलवार, चंद्रकांत बेतावार व इतर सदस्य उपस्थित होते . नवीन कार्यकारिणी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करीत पुढील वाटचाली करिता प्रांत पदाधिकाऱ्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

दीपक देशपांडे यांचे नेतृत्वात मूलच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या कार्याला अधिक बळ व गती प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची बाब उपस्थित सगळ्यांनीच आपल्या वक्तव्यात नमुद केली. व जिल्ह्यातील ग्राहक जागृतीचे कार्य अधिक क्रियाशील होऊन ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे कार्य म्हणजे फक्त चळवळ नसून ग्राहकांना आपले हक्क व अधिकार यांची जाणीव करुन देण्याचा व शोषणमुक्त समाजरचना उभी करण्याचा पाया ठरावा अशी इच्छा व अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नवनियुक्त सर्वच पदाधिकाऱ्यांचे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी स्वागत केले असून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments