Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पारंपारिक संस्कृतीचे जतन करत देवीचे विसर्जन, न्यू शारदा महिला मंडळ चा उपक्रमPreservation of traditional culture

पारंपारिक संस्कृतीचे जतन करत देवीचे विसर्जन, न्यू शारदा महिला मंडळ चा उपक्रम

मूल (अमित राऊत)

मूल तालुक्यातील बेंबाळ येथील न्यू शारदा महिला मंडळ च्या वतीने मॉ दुर्गेची स्थापना केली होती. या महिला मंडळाने जुनी व पारंपारिक संस्कृती जोपासत देवीचे थाटामाटात विसर्जन केले. आजच्या काळात डीजेच्या तालावर थिरकणारी युवा पिढीला गणपती विसर्जन, देवी विसर्जनला ओबडधोबड गाण्याच्या तालावर डीजेच्या कर्णकर्कश आवाजात बेधुंद नाचत असतात. सर्वांनाच हा प्रकार आवडत असल्याने जुनी व पारंपारिक पद्धत लोप पावली जात आहे.

जुनी संस्कृती व परंपरा टिकून राहावी म्हणूनच न्यू शारदा महिला मंडळाने गावातीलच भजन मंडळ तसेच डफऱ्यांच्या तालासुरात नाचत गाजत देवीचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पाडले. अशा प्रकारच्या देवीच्या विसर्जनाने परिसरात सर्वत्र चर्चा होत असून सर्वांनी या संस्कृतीचे व पारंपारिक पद्धतीचे कौतुक केले. 

न्यू शारदा महिला मंडळच्या वतीने ममता पवन निलमवार, भाग्यश्री यशवंतवार,भावना दयालवार,कविता नन्दीग्रामवार, चेतना निलमवार,लीला पेद्दापल्लीवार,स्वीटी पिटलवार , प्रणीत यशवंतवार,कविता निलमवार,पौर्णिमा रोहनकर ,रेखा रोहनकर,आशा जिलपल्लीवार,शोभा जिलपल्लीवार,नंदा नन्दीग्रामवार,तसेच समस्त कन्नमवार चौक वार्ड तसेच न्यू शारदा महिला मंडल यांच्या उपस्थीतीत पार पडला.

Post a Comment

0 Comments