Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चंद्रपूरच्या व्यापाऱ्याला मूल तालुक्यात लुटले Robbery of five lakhs

मूल तालुक्यांत शस्त्राचा धाक दाखवून पाच लाखांनी लुटले

मूल प्रतिनिधी

चंद्रपूर येथील व्यापारी जितू ठक्कर हे चामोर्शी येथे आयसर या चारचाकी वाहनाने दुकान सामानाची वसुली करण्यासाठी गेले होते. वसुली करून परत येत असताना मूलजवळील चांदी येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांनी गाडीला अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे पाच लाख रुपये लुटून नेले.
लुटमार करणारे ४ ते ५ अज्ञात युवक होते. तसेच त्यांच्या वाहनाला क्रमांकही नव्हता, असे ठक्कर यांनी बयाणात सांगितले. शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी ठक्कर यांच्याकडील रक्कम लुटली. यावेळी चोरट्यांनी रकमेसह ठक्कर यांचा भ्रमणध्वनीदेखील पळविला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मूल पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments