Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अनुसूचित जमातींच्या नागरीकांची मतदार नोंदणी, भगवानपूर येथे विशेष शिबिराचे आयोजन Special Camp for Scheduled Tribes

अनुसूचित जमातींच्या नागरीकांची मतदार नोंदणी, भगवानपूर येथे विशेष शिबिराचे आयोजन

मूल प्रतिनिधी
जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार
आज दिनांक 28 शनिवारला 72 बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 130 भगवानपूर तालुका मूल जिल्हा, चंद्रपूर येथे अनुसूचित जमातींच्या नागरिकांची मतदार नोंदणी करिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिरामंध्ये उपस्थित 71 चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर व 72 बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी, मुल तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, मुल व भद्रावती यांच्या उपस्थितीत नव मतदारांचे मतदार नोंदणी संबंधात नमुना 6 भरुन स्विकारण्यात आले. सदर शिबिरामंध्ये नमुना 6 चे 20 फॉर्म भरण्यात आले. नमुना 8 चे 7 फॉर्म भरण्यात आले. सदर शिबिरामंध्ये अनुसूचित जमतींच्या नागरिकांचे एकूण 27 फॉर्म प्राप्त झाले.

Post a Comment

0 Comments