Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अपघातात पत्नी ठार तर पती जखमी, मूल तालुक्यांतील घटना Accident

अपघातात पत्नी ठार तर पती जखमी, मूल तालुक्यांतील घटना

मूल प्रतिनिधी
मूल तालुक्यातील आगडी टर्निंग पॉईंट वर ट्रॅव्हल्स आणि दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार ला दुपारी तीन ते साडेतीन वाजता चे दरम्यान घडली. सुरेखा जितेंद्र बोनाडे वय वर्ष 36 राहणार बंगाली कॅम्प चंद्रपूर असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

मूल वरून चंद्रपूरकडे बाबा जीलानी गाडी नंबर एम एच 15 AK 1698 जात असताना चंद्रपूर वरून मूल मार्गे गडचिरोली ला जितेंद्र गोनाडे हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलासह ओवाळणी कार्यक्रमाला जात असल्याची माहिती आहे.

केसलाघाट आगडी गावाच्या दरम्यान टर्निंग पॉईंटवर असणाऱ्या खड्याला चुकवीत असताना नियंत्रण गेल्याने दुचाकीवर असलेल्या सुरेखा गोनाडे ह्या भरधाव जात असलेल्या ट्रॅव्हल्स च्या चक्यात आल्या, त्यात त्यांचा मृत्यु झाला. तर तिचे पती जितेंद्र गोनाडे हे जखमी झाले आहे. ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments