Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

साहित्यमानव — मानवी भावनांचा साहित्य संग्रहाचे ई बुक प्रकाशन E book publishing

साहित्यमानव — मानवी भावनांचा साहित्य संग्रहाचे ई बुक प्रकाशन

मूल प्रतिनिधी


ग्रामिण भागातील साहित्यिकांना एक व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या साहित्याला चालना मिळावी या दृष्टीने साहित्यमानव—मानवी भावनांचा साहित्य संग्रह या साहित्य संग्रहाची निर्मिती करण्यात आली.या साहित्य संग्रहाच्या ई बुक प्रकाशन सोहळयाचे आयोजन बेंबाळ येथिल विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले.हा ई-बूक प्रकाशन सोहळा धनत्रयोदशीच्या दिवशी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एन. जे. आरेकर हेे होते. प्रमुख अतिथि म्हणून रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचे तुकाराम पेटकुले , साहित्य संग्रहाचे मुख्य संपादक प्रा. संतोष शनगरवार, संपादक प्रा. मनोज अहिरकर, साहित्यिक  प्रा. डॉ. अर्चना पोटे, श्री. लक्ष्मण खोब्रागडे उपस्थित होते.  दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. सुभाष सोनुले यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून साहित्य संग्रह निर्मितीची भूमिका स्पष्ट केली. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करून प्रकाशन करण्यात आले. यावेळही संपादक मंडळातील संदेश शनगरवार यांनी पुस्तक निर्मितीतील अनुभव व्यक्त केले. प्रा. लोमेश देशमुख, श्री. लक्ष्मण खोब्रागडे, प्रा. डॉ. अर्चना पोटे, सुभाष गेडाम,पाल,प्रा.राहूल नरहरशेटटीवार यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. यावेळी ई बुकातील निवडक उत्कृष्ट साहित्याचे वाचन करण्यात आले.  जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी चे मुख्याध्यापक प्रा. मनोज अहिरकर यांनी सर्वांना भविष्यात होणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. साहित्य संग्रहाचे मुख्य संपादक प्रा. संतोष शनगरवार यांनी साहित्य संग्रहाची भूमिका स्पष्ट केली व भविष्यात असे अनेक उपक्रम राबविण्याचा निर्धार या प्रसंगी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष  एन. जे. आरेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगत संपादक मंडळाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संघपाल रामटेके यांनी केले व उत्कृष्ट काव्यवाचनही केले. कार्यक्रमास  संजय अहिरकर,  महादेव भोयर,  सुधाकर भिवनकर,  गोविंदा रोहणकर,  प्रसाद कुसराम,  प्रकाश पंधरे, योग उरकुंडवार हे कार्यक्रमस्थळी तर  राजेंद्र रापतवार, श्री. आनंद आकनूरवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments