Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे स्नेहमिलन सोहळा व शहिदांना आदरांजली कार्यक्रम संपन्न, स्नेहबंध सोशल अँड कल्चरल फॅमिली क्लब चा उपक्रम Friendship ceremony and homage to the martyrs

मूल येथे स्नेहमिलन सोहळा व शहिदांना आदरांजली कार्यक्रम संपन्न, स्नेहबंध सोशल अँड कल्चरल फॅमिली क्लब चा उपक्रम

मूल (अमित राऊत)

मूल शहरात स्नेहबंध सोशल अँड कल्चरल फॅमिली क्लब, मूल तर्फे स्नेहमिलन सोहळा व 26 नोव्हेंबरला मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यातील समस्त शहीद शूरवीरांना आदरांजली कार्यक्रम मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात आला होता. समाजात एकोप्याची भावना निर्माण व्हावी, एकत्र येत ऋणानुबंध जपावे या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात प्रसिद्ध सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजगडचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील मारकवार, स्नेहबंध फॅमिली क्लब मूल चे अध्यक्ष संजय येरोजवार, इंडियन केमिस्ट असोसिएशनचे डायरेक्टर मुकुंद दुबे, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आदी प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होते. यावेळी चंदू पाटील मारकवार यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. 

कार्यक्रमांमध्ये शहिदांना आदरांजली म्हणून देशभक्तीपर समूह नृत्य, देशभक्तिपर गायन करण्यात आले. कार्यक्रमात मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी व नागरिकांनी परिवारासह कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे संचालन स्नेहबंधचे सचिव निलेश राय, प्रास्ताविक सचिन चिंतावार तर आभार प्राचार्य अविनाश गरपल्लीवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments