Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल ची किमया खोब्रागडे एकपात्री स्पर्धेत प्रथम, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड Selection for National Competition

मूल ची किमया खोब्रागडे एकपात्री स्पर्धेत प्रथम, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मूल प्रतिनिधी

समग्र शिक्षाअंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कला उत्सवात पुणे येथील

महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या महोत्सवात राज्यस्तरीय कला उत्सव एकपात्री स्पर्धेमध्ये माउंट कॉन्व्हेंट अँड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मूलची विद्यार्थिनी किमया किरण खोब्रागडेला प्रथम बक्षीस मिळाले असून, तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे, विस्तार अधिकारी जयश्री गुञ्जनवार, प्रमोद कोरडे, मुख्याध्यापिका रिमा कांबळे, उपमुख्याध्यापक अष्पाक सय्यद यांनी तिचा सत्कार केला.

Post a Comment

0 Comments