Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

युवकांनी राबविला ग्राम स्वच्छता अभियान, दर आठवड्यातून एकदा करणार गाव स्वच्छ Youth Cleanliness Campaign

युवकांनी राबविला ग्राम स्वच्छता अभियान, दर आठवड्यातून एकदा करणार गाव स्वच्छ

मूल (अमित राऊत)

मूल तालुक्यातील चिखली गावात जय श्री हनुमान क्रीडा मंडळ च्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान सुरू करण्यात आला. गावाची स्वच्छता राखावी, गावात आरोग्य नांदावे, प्रत्येक नागरिकांचे शरीर सुदृढ राहावे, या उदात्त हेतूने चिखली गावातील युवकांनी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याचे धाडस केले.

26 नोव्हेंबर संविधान दिनापासून गाव स्वच्छ करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. आपला घर आपण जसे स्वच्छ ठेवतो तसंच आपला गाव आपणच स्वच्छ केला पाहिजे असा निर्धार गावातील युवकांनी केला आहे. त्याचा फायदा स्वतःसह संपूर्ण गावाला होणार आहे. आणि ते आपली स्वतःची नैतिक जबाबदारी असल्याचे युवकांचे म्हणने आहे. यातून प्रशासनाला सहकार्य होत असून शासनाच्या उपक्रमा ला सुद्धा सहकार्य होईल.

गाव स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील रविवार हा एक दिवस निवडण्यात आला. गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम चिखली गावातील जय श्री हनुमान क्रीडा मंडळानी हाती घेतला आहे. या अभियानाची सुरुवात ग्रामपंचायत ते संपूर्ण गाव अशी करण्यात आली. या अभियानात युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.

Post a Comment

0 Comments