Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथील विद्यार्थांनी 51 वे तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीमध्ये सुयश

बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथील विद्यार्थांनी 51 वे तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीमध्ये सुयश

मूल प्रतिनिधी

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालीत बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथील विद्यार्थांनी 51 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी टेकाडी येथे आयोजित केले होते आमच्या विद्यालयातील विद्यार्थांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गैर आदिवासी गटातून स्पर्धा आयोजित केले होते या स्पर्धेमध्ये तालुक्यातील शंभरावर विद्यार्थांनी सहभाग घेतला होता यात बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथिल विद्यार्थांनी बिगर आदिवासी माध्यमिक गटातून विज्ञान प्रदर्शनी मध्ये कुमारी उत्कर्षां सिकंदार वाळके, कुमार अंश मनोज तेलसे याने प्रथम क्रमांक पटकविला आहे तसेच प्राथमिक गटातून विज्ञान प्रदर्शनी मध्ये कुमार शाक्य रजित लाकडे व कुमारी उर्वशी बंडू पेंदोर यांनी तृत्तीय क्रमांक पटकविला आहे तसेच माध्यमिक गटामध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये कुमारी कशिश छगन रामटेके हिने तृतीय क्रमांक पटकविला आहे यांच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य विनोद सर तसेच मार्गदर्शन शिक्षक श्री सुरज वसाके, सौं तोषी जयस्वाल, कु शिरीषा मेडपल्लीवार,श्री प्रणित नमुलवार, आदी शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शाळेचे संपूर्ण शिक्षक, शिक्षिका, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments