Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मूल पंचायत समिती समोर डफरी वाजवी निषेध Agitation of Gram Panchayat Employees

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मूल पंचायत समिती समोर डफरी वाजवीत निषेध

मूल (अमित राऊत)


महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना तालुका शाखा मूल च्या वतीने सोमवारपासून पंचायत समिती समोर तीन दिवसीय काम बंद आंदोलन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केले Gram Panchayat 

आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटन या कार्यालयात करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे, वेतनासाठी लागलेली वासुलीची अट रद्द करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधात सुधारणा करणे, जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून ऐकून रिक्त पदाच्या दहा टक्के प्रमाणे वर्ग 3 व वर्ग 4 चे पदावर नियुक्ती देणे, माहे आगस्ट 20 ते मार्च 2022 पर्यंतचा थकीत वेतन तात्काळ अदा करणे आदी प्रमुख मागण्यांना घेऊन कर्मचारी आंदोलन करीत Payment, Andolan

आंदोलनात कर्मचाऱ्यांनी डफली वाजवी शासनाचा निषेध नोंदविला. तर विविध नारे लावत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अमोल वाढई, सचिव महेश मांदाळे, राकेश कलसार, सिद्धार्थ मानकर, शेखर नेवारे, कावळे आदी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments