Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मुख्याधिकाऱ्यांनी केली सफाई कामगारांची नियुक्ती

लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मुख्याधिकाऱ्यांनी केली सफाई कामगारांची नियुक्ती

मूल प्रतिनिधी
 
अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन रजिस्ट्रेशन नंबर 72 62 महाराष्ट्र प्रदेश तालुका शाखा मुल जिल्हा चंद्रपूर संघटनेच्या माध्यमातून दिनांक १४ डिसेंबर २०२३ मुल नगरपरिषद येथे सौ शशिकलाबाई महानंदै सफाई कामगार पदावर कार्यरत होते. त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर लाड पागे समीतीचा शिपारशी नुसार वारसा हक्काचे आदेश मुल नगरपरिषद चे मुख्य अधिकारी  श्री पवार साहेब यांनी त्यांच्या मुलाला सफाई कामगार या पदावर नियुक्ति आदेश दिले. त्या सोबतच नंदाबाई शेंद्रे यांच्या मुलाला सुद्धा नियुक्तीचे आदेश देण्यात आले.
यावेळी कार्यालय अधीक्षक विनोद येनुरकर वरिष्ठ लिपिक भुरशे, आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार, अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सदिप पारचे यांची प्रमुख उपस्थिति होती. मुख्यअधिकारी यांचे संघटनेचा वतीने आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments