Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चंद्रपूरच्या सुरज ने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत मिळविले गोल्ड मेडल, आईच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य Bodybuilding competietion

चंद्रपूरच्या सुरज ने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत मिळविले गोल्ड मेडल, आईच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

मूल (अमित राऊत)

चंद्रपूर शहरातील सूरज तिवाडे या युवकाने नुकताच झालेल्या चंद्रपूर जिल्हा स्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 55 किलो वजन गटात प्रथम क्रमांक आणि बेस्ट पोजर टायटल मिळवित गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. या आधी सूरजने बल्लारशा, चंद्रपूर, अमरावती, पालकमंत्री चषक स्पर्धा अशा विविध ठिकाणी स्पर्धेत भाग घेऊन विविध क्रमांक, रोप्य पदक आदी पदके मिळविले आहे.

सुरज चंद्रपुरातील जलनगर परिसरात आपल्या आई सोबत राहतो. काही वर्षा आधी वडिलांचे छत्र हरपले. सुरज चे वडील आमदार किशोर जोरगेवार यांच्या डेकोरेशन व्यवसायात कामावर होते. जिम मध्ये काम करून, अनेकांना शरीरयष्टी बद्दल मार्गदर्शन करीत आपला
उदरनिर्वाह करीत आहे. गरीब परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीने परिश्रम करून तो आपला ध्येय गाठण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. मुलाने प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असताना त्याच्या आवडत्या कार्यात गोल्ड मेडल प्राप्त केल्याने आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

Post a Comment

0 Comments