Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

लावारिस कुत्र्याने बालकाला केले गंभीर जखमी Child seriously injured by stray dog

लावारिस कुत्र्याने बालकाला केले गंभीर जखमी

मूल (अमित राऊत)

मूल शहरात लावारिस कुत्र्याने सात वर्ष बालकाच्या डाव्या हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना शहरांतील वाल्मिकी नगर येथे घडली. जखमी झालेल्या बालकाला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता पाठविले आहे. आरुष मंगेश शेंडे वय वर्ष 7 असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली.

मूल शहरातील अनेक वार्डात लावारिस कुत्र्यांचा हैदोस वाढलेला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे मूल नगरपरिषदेने त्वरीत लावारिस कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकटेश पुलकवार यांनी नगरपालिकेला निवेदन देऊन केली आहे.

Post a Comment

0 Comments