Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन संपन्न Dr. Babasaheb Ambedkar

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन संपन्न

मूल (अमित राऊत)

मूल शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन विद्यालयामध्ये साजरा करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य विनोद सर उपस्थित होते. तर मुख्य अतिथी म्हणून सौं विद्या देवगडे शिक्षिका जि. प. प्राथ. शाळा नलेश्वर आणि सौं सुरभी वैरागडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच शाळेचे प्राचार्य विनोद सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थांना सांगितले तसेच सर्व मान्यवर व शिक्षिका आणि विद्यार्थी, विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषण सौं दुर्गा कोटगले यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वरा बाकडे वर्ग 8 वा हिने केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमार नैतिक चिटमलवार वर्ग 8 वा यांनी केले तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments