Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यात ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती पथक रवाना EVM VVPAT Awareness

मूल तालुक्यात ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती पथक रवाना

ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती पथक 24 डिसेंबर 2023 ते 5 फरवरी 2024 या कालावधीत संपूर्ण बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांना भेटी देऊन ईव्हीएम व्हीव्हीपॅट द्वारे मॉक पोल Mock Poll च्या माध्यमातून जनजागृती करणार आहे.

याद्वारे मतदारांच्या मनातील ईव्हीएम बद्दल असलेल्या शंकांचे निरसन करणार आहे. तरी मुल तालुक्यातील आणि 72 बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व जागृत नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपल्या मनातील ईव्हीएम बद्दलच्या शंका दूर करण्याचे आव्हान मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांनी केले आहे.

सदर पथकात ईव्हीएम मशीनची जाण असणारे तज्ञ, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments