Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

तलवारबाजी स्पर्धेत मूल ची चैताली देशात तिसरी, मंत्री मुनगंटीवार यांनी केले कौतुक Fencing competition

तलवारबाजी स्पर्धेत मूल ची चैताली देशात तिसरी, मंत्री मुनगंटीवार यांनी केले कौतुक

मूल प्रतिनिधी

हरिवंस भगत खेलगावं राची झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय थांग ता तलवारबाजी स्पर्धेत मुलंच्या बालविकास प्राथमिक शाळा येथे इयत्ता आठवीत वर्गात शिक्षण घेत असलेली चैताली रंगनाथ पेंडूकर हिने आपल्या खेळाचे कौशल्य तसेच चुणूक दाखवीत राष्ट्रीय स्तरावर तलवारबाजी स्पर्धेत 53 किलो वजन गटात यश मिळवीत देशात तिसरा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वनमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी चैताली चे भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

राची येथील या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील 22 राज्यांनी सहभाग घेतला. तिच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक रंगनाथ पेडूकर, भिमानंद चिकाटे, राहुल बहादे, मुख्याध्यापिका सुनीता बुट्टे तसेच आई वडिलांना दिलें आहे. चैताली हि मुल येथील पोलीस पाटील सौ. रत्ना पेडूकर यांची कन्या आहे हे विशेष.

Post a Comment

0 Comments