Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे खैरे कुणबी समाजाचा स्नेहमिलन व सत्कार सोहळ्याचे आयोजनFriendship and felicitation ceremony

मूल येथे खैरे कुणबी समाजाचा स्नेहमिलन व सत्कार सोहळ्याचे आयोजन

मूल प्रतिनिधी

खैरे कुणबी समाज संघटना, मूल तर्फे स्नेहमिलन व सत्कार सोहळयाचे आयोजन योगा भवन,क्रीडा संकुल मूल येथे दिनांक 10 डिसेंबर 2023 ला वेळ 11:30 वाजता करण्यात आलेले आहे. कार्यक्रमात मूल तालुक्यातील खैरे कुणबी समाजील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,मूल बाजार समितीचे नवनिर्वाचीत संचालक आदींचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे.  

समाजाचे एकत्रीकरण, एकोप्याची भावना निर्माण व्हावी. समाजातील व्यक्तींचा सन्मान व्हावा. या उदात्त हेतुने खैरे कुणबी समाज संघटना, मूल तर्फे स्नेहमिलन व सत्कार सोहळयाचे आयोजन केले आहे. तरी या कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments