Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नवभारत कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्षपदी किसन वासाडे तर उपाध्यक्षपदी दिनेश जिड्डीवार Kisan Vasade is the president of Navbharat Karmchari Credit Sanstha and Dinesh Jiddiwar is the vice president

नवभारत कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्षपदी किसन वासाडे तर उपाध्यक्षपदी दिनेश जिड्डीवार

मूल प्रतिनिधी

नवभारत कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचीत संचालकांचे बैठकीत, नविन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यात प्रा. किसन वासाडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदावर नवभारत कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक दिनेश जिड्डीवार यांची तर सचिवपदी नवभारत कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक धिरज नौकरकर यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. जिड्डीवार, नौकरकर, रामटेके, नंदूरकर यांचा सत्कार नवभारत कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पदावर निर्वाचित झालेले दिनेश जिड्डीवार, सचिव धिरज नौकरकर तसेच संचालक म्हणून निवडून आलेले मिलींद रामटेके, कार्तिक नंदूरकर यांचा मुख्याध्यापिका सौ. अल्का राजमलवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ व मिठाई देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे व जेष्ठ शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे यांनी नवनिर्वाचीत पदाधिकारीचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments