Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आश्रम शाळेच्या विद्यार्थ्याची इस्रो सहलीसाठी निवड Selection for ISRO trip

आश्रम शाळेच्या विद्यार्थ्याची इस्रो सहलीसाठी निवड

मूल प्रतिनिधी

अनुदानित प्राथमिक तथा माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा जानाळा येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी करन रामदास मडावी याची बंगलोर येथील इस्रोच्या सहली करीता निवड झाली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी माननीय मुरगानंथम यांच्या उपक्रमांतर्गत ५ सप्टेंबर शिक्षक दिनी ऑनलाइन उत्कृष्ट अध्यापन केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली. या निवडीमागे मुख्याध्यापक श्री.काळे , वर्गशिक्षक श्री. राऊत यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले तसेच सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments