Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची मूल येथे दारूची कार्यवाही, 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची मूल येथे दारूची कार्यवाही, 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मूल प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने मूल येथे येऊन 3 लाख 10 हजार 720 रुपयाचा देशी विदेशी दारु चारचाकी वाहनासह जप्त केले आहे. ही कार्यवाही 11 जानेवारी गुरुवारी सायंकाळी केली. सत्विंदर सिंग उर्फ बंटी नयनसिंग पटवा राहणार मूल असे आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या घरी देशी विदेशी दारू गाडीसह असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तपासणी केली असता देशी विदेशी दारू सापडली. त्या आधारे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन साळवे आदी कर्मचारी यांनी केली. या कार्यवाहीने अवैध दारू विकणाऱ्यावर वचक बसला आहे.


मूल पोलिसांची हळदी येथे अवैध दारू ची कार्यवाही

मूल तालुक्यातील हळदी गावात अवैद्य देशी दारू सह 48 नग 1 हजार 780 रुपयाची कार्यवाही 11 जानेवारी गुरुवारी दुपारी दोन वाजता मूल पोलिसांनी केली. विजेंद्र शेंडे राहणार हळदी असे आरोपीचे नाव आहे. अशी माहिती मूल पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments