Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

उच्च शिक्षणाचा अन् अधिकारी होण्याचा संकल्प करा - प्रकाश पाटील मारकवार

उच्च शिक्षणाचा अन् अधिकारी होण्याचा संकल्प करा - प्रकाश पाटील मारकवार

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील मच्छी चौक राजोली येथील युवामित्र परिवार तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, उदघाटक जि. प.ची माजी अध्यक्षा संध्याताई गुरूनुले ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत समर्थ, जितेंद्र लोणारे सरपंच, आनंदराव ठीकरें, बंटी निकुरे, प्रमोद चिंतावार , अजिंक्य प्रकाश पाटील, सुरेश ठीकरे हे होते.

प्रकाश पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले, नवीन वर्षामध्ये जनतेने वेगवेगळे संकल्प करावेत, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मेरिट मध्ये येण्याचा संकल्प करावा. 
मी जि. प.अध्यक्ष असताना त्यावेळी जि. प.शाळेचे तीन विद्यार्थी पहिल्यांदाच मेरिट मध्ये आले होते. तरुणांनी व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवण्याचा संकल्प करावा,ग्रामीण भागातील  महिलांनी आरोग्य उत्तम ठेवण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, शेतकरी बांधवांनी भरघोस पिक उत्पादन घेण्याचा संकल्प करावा. या भागात अनेक युवक सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी योग्य रोजगार मिळविण्याचा संकल्प करावा. 

पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देवून भविष्यात त्यांना डॉक्टर, इंजिनीयर, आय. ए. एस. ऑफिसर, उच्च अधिकारी बनविण्याचा संकल्प करावा. 
कार्यक्रमाला राजू पा. ठीकरे, श्याम पेशेट्टीवार, जगदीश निकूरे, सारंग पेशेट्टिवार तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विवेक ठीकरे, गणेश येनुरकर, अविनाश लाकडे, श्रीहरी भेंडारे, मधुकर गेडाम व युवा मित्र परिवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments