Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मूल तालुका अध्यक्षपदी रोहित कामडे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मूल तालुका अध्यक्षपदी रोहित कामडे

मूल प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मूल तालुका अध्यक्षपदी रोहित कामडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आम.राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
रोहित कामडे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणुन कार्य करीत आहेत. अगोदर त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मूल तालुका अध्यक्ष म्हणुन यशस्वी कार्य केले आहे. त्याच्या कार्याची दखल घेत आज चंद्रपूर येथे आमदार राजेंद्र जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राकेश सोमाणी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीनभाऊ भटारकर आणि मूल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांना दिलें असुन त्याच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मूल शहर अध्यक्ष आकाश येसनकर, तालुका उपाध्यक्ष महेंद्र गोंगले, वासुदेव पीपरे, महिला तालुका अध्यक्ष संगीताताई गेडाम, तालुका सचिव प्रशांत मेश्राम,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मूल शहर अध्यक्ष धारा मेश्राम रोहित शेंडे,आशिष बोरुले,अक्षय बोरुले,निशांत जेगठे, सचिन शेंडे,अंकुश वाढई आदिनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments