Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा Celebrating National Voter's Day

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा

मूल (अमित राऊत)

मतदार नोंदणी अधिकारी 72-बल्लारपूर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल तसेच मुल - शिक्षण प्रसारक मंडल मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे राज्यशास्त्र विभाग, एनसीसी, एनएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यामध्ये लोकशाही तसेच मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने दिंनांक 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.अनीता वाळके प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मूल, तसेच प्रमुख पाहुणे श्री. विश्वास कुमार मेश्राम उपविभागीय अधिकारी मूल, श्री. राठोड साहेब गटविकास अधिकारी मूल, श्री. यशवंत पवार, तसेच नायब तहसिलदार (निवडणूक)मूल तथा प्रभारी मुख्याधिकारी नगर परिषद मूल उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. प्रवीण उपरे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य स्पष्ट केले. तसेच उज्वल भविष्य घडविण्यात मतदारांचा महत्वाचा वाटा असतो. त्याकरिता विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही आणि मतदान प्रक्रिया माहीत असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. गटविकास अधिकारी श्री. राठोड साहेब यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रांची मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे नोंडल अधिकारी म्हणून काम आम्ही हाती घेतले आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मित्र मैत्रीणी नातेवाईक यांना मोठ्या प्रमाणात मतदान नोंदणी तसेच मतदान करण्याचे आव्हान केले. उपविभागीय अधिकारी श्री विश्वासकुमार मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व अधोरेखित करताना म्हटले की मतदानामध्ये बंदुकीच्या गोळी पेक्षाही जास्त ताकत मतदानात असते. म्हणून आपले अमूल्य मत योग्य उमेदवाराला देऊन लोकशाहीच्या मजबुतीकरिता निस्वार्थी आणि निष्पक्षपाती मतदान झाले पाहिजे. त्याकरिता जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून आपले राष्ट्रीय कर्त्यव्य आपली जबाबदारी समजून पार पाडली पाहिजे असे मत व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्व भारतीय नागरिक आहो, मतदानाचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले शस्त्र असून त्या शस्त्राचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे तरच आपल्याला आपले उज्वल भविष्य घडविता येईल. त्याकरिता विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने मतदान नोंदणी करण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेऊन करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. सिकंदर लेनगुरे तर आभार प्रा. सागर मासिरकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रासेयो स्वयंसेवक राष्ट्रीय छात्रसेना कडेट्स प्राध्यापकवृंद आणि शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments