Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे स्नेहबंध पदग्रहण समारंभ व विविध कार्यक्रमाचे आयोजन Snehabandh Inauguration Ceremony

मूल येथे स्नेहबंध पदग्रहण समारंभ व विविध कार्यक्रमाचे आयोजन

मूल (अमित राऊत)

सोशल अँड कल्चरल फॅमिली क्लब, मूल स्नेहबंध पदग्रहण समारंभ 2024 चे आयोजन 26 जानेवारी गणराज्य दिनी करण्यात आले आहे. कार्यक्रम शहरातील मा.सा. कन्नमवार सभागृहात सायंकाळी 5 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे.

थोर पुरुषांच्या समर्पनातुन समाज कल्याणासाठी टाकलेले एक पाऊल म्हणजे "स्नेहबंध फॅमिली क्लब". मूल शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातुन आनंदाची अनुभूती देणारा स्नेहबंध क्लब आहे. शुरवीरांच्या समर्पणातुन समाजसेवेचं वेड लावणारा क्लब म्हणजेच स्नेहबंध क्लब आहे.

सदर कार्यक्रमात सायंकाळी 5 ते 6 वाजता पर्यंत सदस्यांचे आगमन आणि स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 ते 8 पर्यंत पदग्रहण तथा सर्व परिवारांचे मंच स्वागत असणार आहे. रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत देशभक्तीपर गायन आणि नृत्य होणार आहे. रात्री 9 ते 10 पर्यंत जेवणाची सोय असणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अस्सल वऱ्हाडी मेजवानी असणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्नेहबंध फॅमिली क्लब तर्फे करण्यात आले आहे. 
Snehbanda family club

Post a Comment

0 Comments