Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू, मूल तालुक्यातील घटना Death of a young man

दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू, मूल तालुक्यातील घटना

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील भेजगाव पुलालगत आज शनिवारी सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान दोन दुचाकीच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली. मनोज दशरथ नरुले रा. मूल वय 35 असे मृत पावलेल्या युवकाचे नाव असून फुलझेले राहणार खराळपेठ असे जखमी इसमाचे नाव आहे.

मृतक मनोज नरुले हा भेजगावचे सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांच्याकडे खाजगी ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. मनोज भेजगाव वरून मूल ला परत येत असताना मूल वरून फुलझेले नामक व्यक्ती आपल्या दुचाकीने कराडपेठ ला जात असताना भेजगाव चिचाळा गावचे दरम्यान समोरासमोर अपघात झाला.

अपघात भीषण असल्याने मनोज दशरथ नरुले याचा मृत्यू झाला असून समोरील दुचाकी चालक फुलझेले हा जखमी असून उपजिल्हा रुग्णालय मूल येथे उपचार सुरू आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments