Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राजगड मध्ये वाघानंतर बिबटयाचा धुमाकूळ, शेळीला केले ठार; गावात भितीचे वातावरण; बंदोबस्त करण्याची मागणी

राजगड मध्ये वाघानंतर बिबटयाचा धुमाकूळ
शेळीला केले ठार
गावात भितीचे वातावरण,बंदोबस्त करण्याची मागणी

मूल (अमित राऊत)
 
मूल तालुक्यातील राजगड येथे वाघानंतर बिबटयाने धुमाकूळ घातला आहे.बुधवारी रात्री बिबटयाने एका बकरीचा फडशा पाडला.या घटनेने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. सावली वनविभाग वाघाचा बंदोबस्त करू शकला नाही. आतातरी, बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरीत आहे. राजगड येथील दिलीप मगरे यांच्या घरामागील गोठयात शेळी बांधलेली होती. रात्रीच्या संधीचा फायदा घेवून बिबटयाने गावात शिरकाव केला. बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला जागीच ठार केले. पहाटे उठल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दोर न तुटल्याने बिबटयाने शेळीला जागेवरच खाण्याचा प्रयत्न केला.त्याला शेळी उचलून नेता आली नाही.या घटनेमुळे राजगड गावात भितीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने पंचनामा करून गावात पिंजरे लावण्याची मोहिम सुरू केली. राजगड गावात याआधी वाघाने धुमाकूळ घातला होता. गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर वाघाने आपले बस्तान मांडले होते. वाघाला पकडण्याची मोहिम वनविभागाने राबविली होती.परंतु,वनविभागास अपयश आले होते. आतातरी सावली वनविभागाने बिबटयाला पकडण्याची मोहिम राबवून नागरिकांना दहशत मुक्त करावे अशी मागणी राजगडवासियांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments