Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वीज पडून एका महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमी, मूल तालुक्यातील घटना One woman died, two women injured due to lightning

वीज पडून एका महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमी, मूल तालुक्यातील घटना

मूल चिचाळा ( प्रकाश चलाख)
मूल तालुक्यातील चिचाळा येथे वीज पडून एक महिला ठार झाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. चंद्रकला संजय वैरागडे वय 45 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आशा रवींद्र बुरांडे, वंदना मनोज वासेकर या दोन महिला 
जखमी झाले असून त्यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  चंद्रकला संजय वैरागडे यांच्या शेतात एकूण सात महिला निंदा काढण्याचे काम करीत होत्या. अचानक 
आज सकाळी 11 वाजता पासून मूल तालुक्यांत पाऊस बरसला आणि विजांचा कडकडाट होत होता. विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात असल्याने चिचाळा येथील महिला चीचाला शेतशिवारात आपल्या शेतात काम करीत असताना वीज पडून ठार झाल्याची घटना आज घडली या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments