Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुधीर मुनगंटीवार : राजकारणातील आश्वासक चेहरा!

सुधीर मुनगंटीवार : राजकारणातील आश्वासक चेहरा!



१८ व्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, पहिल्या टप्प्यातील निवडणुक ही १९ एप्रिल ला आहे. या निवडणुकीत १३ - चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणुन महाराष्ट्राच्या राजकारणातील हेवीवेट नेते अभ्यासु नेतृत्व, ज्ञानयोगी सुधीर मुनगंटीवार हे निवडणुक लढवित आहे. राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटविल्यानंतर देशाच्या राजकारणातही आपला आश्वासक ठसा उमटवेल यात तिळमात्र ही शंका नाही.
नेत्यांनी-पुढाऱ्यांनी आश्वासन दिले तर ते पुर्ण होणारचं नाही असा जनतेचा समज मागील काही वर्षात मोडीत निघाला. आश्वासन मिळाले ते पुर्ण होणारचं असा विश्वास जनतेमध्ये रुजला गेला तो सुधीरभाऊंमुळे असे म्हटले तर आतिशयोक्ती होणार नाही. अनेकदा 'भाऊंनी दिलेल्या आश्वासनानंतर ते पुर्ण ही केले मग बल्लारपुरला तालुक्याच्या दर्जा देण्याचा मोठा विषय असो की मुल येथे भाजी मार्केट बनविण्याचा लहान विषय असो जो शब्द दिला तो पुर्ण करण्यास 'भाऊ' नेहमी कटिबद्ध असतातचं अपवाद सोडून असे नेहमी बघायला मिळते. महिलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शतकापुर्वी (सन १९१६ ला ) शिक्षणमहर्षी भारतरत्न धोंडो केशव कर्वेयांनी महिलांसाठी देशातील पहिले विद्यालय श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाची स्थापना केली. आज महिलांना शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेली देशातील एसएनडीटी चे उपकेंद्र हे आपल्या जिल्ह्यात आणण्याचा संकल्प 'भाऊंनी केला आज तो पुर्ण होत आहे, ही खरचं सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. नाविण्यपुर्ण - वैशिष्ट्यपुर्ण प्रकल्पाला हेरण्यात ज्ञानयोगी, अभ्यासु सुधीरभाऊ हे नेहमी अग्रस्थानीचं असतात. म्हणुनचं महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे नांव मोठ्या आदराने घेतल्या जाते. भाऊंच्या याचं अभ्यासु वृत्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्याला गौरव प्राप्त झाला आहे. लुप्त असलेल्या वनौषधी ची संग्रहीत करण्यात येवुन त्याचे पुन्हा निर्मीती व्हावी, या संकल्पनेतुन जैव वैविधतेचे अभ्यासकेंद्र श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन चे विसापुरात होत असलेले लोकार्पण हा त्याच अभ्यासु वृत्ती ची व दुरदृशीपणा ची झलक होय. सर्वच कार्यालयीन कामकाज एकाच छताखाली झाल्यास नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही, या दुरदृष्टीतुन जिल्हाधिकारी कार्यालयापासुन अनेक कार्यालयाचे आज नवनिर्माण होत आहे. अशा संकल्पना साक्षात उतरविण्यात भाऊंचा हात कोणीही पकडू शकत नाही. भाऊंच्या दुरदृष्टीपणामुळे चंद्रपूर जिल्हा आज नविन रूपात आकार घेतांना दिसतोय, बल्लारपूर रोडवरील सैनिक स्कुल, मुल रोडवरील वनअकादमी सारखे प्रकल्प भविष्यामध्ये जिल्ह्याचे नांव संपुर्ण देशात गौरव करणारेचं आहे. क्रिडाक्षेत्रात राज्याच्या शेवटच्या टोकातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील तरूण-तरूणींना वाव मिळावा यासाठी भाऊंच्या संकल्पनेतुन जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये आज क्रिडा संकुले स्थापण करण्यात आली आहेत. जिवती सारख्या अति दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थीनी एव्हरेस्ट शिखर चढण्याच्या केलेला विक्रमांमुळे क्रिडा संकुलांची संकल्पना स्पष्ट होते. 'कोशीश करनेवालो की कभी हार नही होती' हे सुधीरभाऊंनी प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यामुळेचं महाराष्ट्राच्या राजकारणाचा आश्वासक चेहरा म्हणुन त्यांचेकडे बघितले जाते. पद कोणतेही असो त्यांचे सोने करण्याचे त्यांच्यामध्ये कौशल्य आहे. एखादा नेता नाराज झाला की त्याला वनमंत्री देऊन टाकायचे अशी एक प्रथा राज्याच्या राजकारणामध्ये होती. पक्षाने राज्याच्या वनमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर कोणतीही नाराजी न ठेवता आज महाराष्ट्र राज्य वनविभागाला देशाच्या अग्रस्थानी नेऊन ठेवले आहे. नतद्रष्ट, करंटे काहीही म्हणत असले तरी भाऊंच्या दुरदृष्टीपणामुळेच हे शक्य झाले आहे, हे वेगळे सांगायला नको. साधारण नगरसेवक किंवा एखाद्या पक्षाच्या पदाधिकारी ही येणाऱ्या प्रत्येकांचे फोन उचलण्यास त्यांच्या समस्या जाणुन घेण्यास असमर्थ असतात. परंतु या उलट राज्याच्या व्यस्त मंत्र्याने आपला फोन उचलला नाही, असे कुणीही कधीही बोलतांना आजपावेतो बघितले नाही. प्रत्येकाचे दुरध्वनी आवर्जुन उचलुन त्यांच्या समस्यांचे हमखास समाधान केले जाते. एखाद्या कारणाने कुणाचा फोन उचलता आला नाही तर त्याला काही अवधीनंतर त्यांच्या कार्यालयातुन किंवा पी. ए. मार्फत फोन करून सुधीरभाऊंशी बोलणे करून दिल्या जाते, हे अनेकांनी बघितले आहे. कामाच्या अतीव्यस्ततेतही हे सुधीरभाऊंना कसे शक्य होते, हा त्यांना मिळालेला 'दैवी गुण' (गॉड गिफ्ट ) असल्याचे त्यांचे विरोधक ही त्यांच्या या विशेष गुणाची खाजगीमध्ये चर्चा करतांना बघायला मिळतात. त्यांच्यासमोर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्या पत्नी आम. प्रतिभा धानोरकर यांना उभे केले आहे. विकास, जातीय समिकरण व सहानुभूती ची लाटेच्या ही लढाई अत्यंत चुरशीची होणार असे सध्यातरी चित्र आहे.

Post a Comment

0 Comments