Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

निवडणुकीत लागलेले वाहन चालक मतदानापासून वंचित

निवडणुकीत लागलेले वाहन चालक मतदानापासून वंचित
 
मूल (अमित राऊत) 


लोकसभेची सार्वत्रिक निवडणुक आज 19 एप्रिल ला पार पडली. यावेळी 13 लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत 72 बल्लारपूर विधानसभा अंतर्गत मूल कार्यालय अंतर्गत वाहनांवर असलेल्या 70 च्या वर चालक मतदानापासून वंचित राहिले आहे.  निवडणुकीत अधिकृत वाहनचालकांवर मतदानाचे संकट वाढत आहे. मतदानाच्या दिवशी ते वाहनांसह बाहेर असतात. अशा स्थितीत ते मतदान कसे करणार, याबाबत कोणत्याही स्तरावर कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. प्रशासनालाही यावर पर्याय शोधता आलेला नाही.

लोकसभेच्या निवडणुकीकरिता हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत. चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. निवडणुकीत गुंतलेले कर्मचारीही पोस्टल मतदान केले. मात्र 70 हून अधिक अधिकृत वाहनांच्या चालकांसाठी मतदानासाठी कोणतीही व्यवस्था केल्या गेली नव्हती. अशा परिस्थितीत या चालकांना मतदान प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले आहे.

मतदानापासून कुणीही वंचित राहू नये 100 टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असते, मात्र शासना च्या कर्मचाऱ्यांना ने-आन करणाऱ्या वाहन चालकांनाच मतदानापासून वंचित राहावे लागत असेल तर 100 टक्के मतदान कसे होणार असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत. मूल येथील जय संघर्ष चालक-मालक संघटनेचे विवेक मुत्यलवार यांनी वाहन चालकांना मतदानाची व्यवस्था नसेल तर ही लोकशाहीच्या दृष्टीने मोठी दुर्दैवाची बाब असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments