Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कृष्णा फेरो अलॉय कंपनीच्या नवीन प्रकल्पाबाबत जन सुनावणी संपन्न, स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन

कृष्णा फेरो अलॉय कंपनीच्या नवीन प्रकल्पाबाबत जन सुनावणी संपन्न, स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन 

मूल (अमित राऊत)


मूल च्या  एमआयडीसीतील जी.आर. कृष्णा फेरो अलॉय प्रा. लि. यांच्या नवीन प्रकल्पाचे पर्यावरण विषयक जाहीर जन सुनावणीची सभा संपन्न झाली. या प्रकल्पांतर्गत कंपनीचे नवीन प्रकल्पाबद्दल, महाप्रबंधक मनोज अग्रवाल यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती या सभेत दिली. या  प्रकल्पांतर्गत स्पोंज आयरन, एसएमएस, रोलिंग मिल, कोलवाशरी, वीज निर्मितीच्या प्रकल्प, या नव्या कार्यप्रणालीच्या  माध्यमातून उत्पादन होण्याची माहिती प्राप्त झाली आहे. सभेला अजुबाजुच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या बेरोजगारीच्या प्रश्न मिटेल व स्थानिक लोकांना  रोजगारांमध्ये  प्राथमिकता देण्याची आवाहन सभेला उपस्थित ग्रामस्थाननी केले. नागरिकांच्या रोजगाराच्या आव्हानाला कंपनी प्रबंधाने आश्वासन दिले.  या सभेला अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी पवार साहेब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यादव साहेब व उप प्रादेशिक अधिकारी बहादुले साहेब तसेच स्थानीय विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments