Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कृषी अधिकारी डॉ.अपर्णा मन्मथ ढेले- कासराळे यांना आचार्य पदवी

कृषी अधिकारी डॉ.अपर्णा मन्मथ ढेले- कासराळे यांना आचार्य पदवी

मूल (अमित राऊत)


येथील बँक ऑफ इंडिया बेंबाळ शाखेतील कृषी अधिकारी डॉ. अपर्णा मन्मथ ढेले- कासराळे यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे  झालेल्या ३७ व्या दीक्षांत समारंभात त्यांना गौरवण्यात आले. डॉ. अपर्णा मन्मथ ढेले- कासराळे यांनी कृषी विस्तार शिक्षण विभागातील संगमनेरी शेळी वर व्यवस्थापन आणि पालन या विषयावर शोध  लावला. "अडाप्शन आफ मॅनेजमेंट प्रटिक्स अन्ड युटिलिटी परशेप्सन आफ संगमनेरी गोट रिअरर्स अन्ड नान डिसस्क्रीपसन गोट रिअरर्स- अ कम्पारिटीव्ह स्टडी " हा त्यांचा विषय होता. 

या प्रबंधासाठी  कुलगुरू प्रशांत कुमार पाटील यांच्या हस्ते आचार्य पदवी (PhD) देण्यात आली. सध्या त्या मूल तालुक्यातील बँक ऑफ इंडिया बेंबाळ शाखेत कृषी अधिकारी या पदावर आहेत. मूल येथील तालुका कृषी अधिकारी  प्रशांत कासराळे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत.त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments