Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शासकीय आदिवासी वसतिगृह येथे मानसिक आरोग्यावर कार्यक्रम

मूल शासकीय आदिवासी वसतिगृह येथे मानसिक आरोग्यावर कार्यक्रम

मूल (अमित राऊत)

होप फॉउंडेशन सिरोंचा आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी मुलांचे - मुलींचे वसतिगृह मूल येथील विद्यार्थीना "मानसिक आजार समजून घेताना "या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून होप फॉउंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष नागेश मादेशी तर अध्यक्ष म्हणून आदिवासी मुलींचे वसतिगृह मुल येथील गृहपाल एस. एम. गजभिये, प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मुल येथील गृहपाल प्रशांत फरकाडे, बहूउद्देशीय कर्मचारी काजल शरद दुधे, आंनद भैसारे, उपजिल्हा रुग्णालय मूल येथील एन. सी. डी. समुपदेशक ममता शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

होप फॉउंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष नागेश मादेशी यांनी उपस्थित विद्यार्थी - विद्यार्थीनीना जसे शारीरिक आजार हे महत्वाचे असते अगदी त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ पण महत्वाचे असून आपण सर्वांनी या आजाराबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन आपण एक विद्यार्थी म्हणून समाजात याबद्दल जागृती करणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यानंतर मानसिक आजाराची व्याख्या, त्याचे लक्षणे, एकुण प्रकार, आणि मानसिक आजार होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर मोबाईलचे व्यसन म्हणजे काय त्याचे आपल्या अभ्यासावर कसा दुष्परिणाम होतो याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थी जीवन हे सुंदर असून कितीही अडचणी, संकट आले तरी अजिबात खचून न जाता, हिम्मत न हरता जीवन जगा असे मोलाचे मार्गदर्शन केले. आत्महत्या प्रतिबंधन विषयक मार्गदर्शन पण केले. विद्यार्थी जीवनात परीक्षेला समोर जात असताना येणारा ताण कसा कमी करावे याबद्दल ताण तणाव विषयक मार्गदर्शन पण यावेळी होप फॉउंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष नागेश मादेशी यांनी केले. गृहपाल गजभिये यांनी उपस्थितांना, हल्ली लहान सहन गोष्टी वरून विद्यार्थी आत्महत्या करताना दिसून येत आहे अनेकदा आपल्याला माहिती नसते असे का होत आहे. पण हे सर्व मानसिक दृष्ट्या सक्षम नसल्याने होत असते.  निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते त्यामुळे तुम्ही नेहमी प्रसन्न आणि आशावादी रहा असे मार्गदर्शन केले. एन. सी. डी समुपदेशक ममता शेंडे यांनी उपस्थितांना खर्रा, गुटखा, तंबाखू चे शारीरिक आणि मानसिक पातळीवर काय परिणाम होतो याबद्दल मार्गदर्शन करून त्याचे होणारे दुष्परिणाम बद्दल मार्गदर्शन केले. तसेच फास्ट फूड आणि जंग फुडमुळे लठ्ठपणा आणि इतर आजार वाढत असून आपण ते खाऊ नये आपण नियमित पणे व्यायाम आणि सकस आहार घ्या असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला एकूण 72 विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते.

गृहपाल प्रशांत फरकाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन योगेश योगेश अरुण सिडाम तर आभार प्रदर्शन कु. प्राची भास्कर मडावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शासकीय आदिवासी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थी- विद्यार्थीनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments